भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2020 अर्थात ‘बी सारा लेडीज इक्वलिटी मॅरेथॉन 2020 आयोजन करण्यात येणार असून ही स्पर्धा ही केवळ लहान मुली, शालेय तथा महाविद्यालयीन तरुणी व महिलांसाठी असून जागतिक महिला दिना निमित्त समस्त महिलावर्गाचा सन्मान व समानता या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे प्रा.प्रवीण फालक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
शासकीय विश्राम गृह येथे रविवार रोजी आयोजित परिषदेत
समन्वयिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी सांगितले की,
चार किलोमीटर अंतरासाठी स्पर्धा
ही स्पर्धा चार किमी अंतराची असून महिलांना धावणे व चालणे या दोन्ही प्रकारात भाग घेण्याची संधी राहणार आहे. महिलांनी आपले करिअर तसेच कुटुंबासोबत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे हा देखील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले . सदरच्या स्पर्धेसाठी नाममात्र 150 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून स्पर्धकांना आयोजकांतर्फे टी-शर्ट, मेडल व फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी डॉ. संजय नहेेते हॉस्पिटल जामनेर रोड व सुप्रभा एक्सिडेंट हॉस्पिटल (डॉ. तुषार पाटील हॉस्पिटल), पेट्रोल पंप जळगाव रोड, भुसावळ येथे फॉर्म उपलब्ध आहेत. नाव नोंदणीची प्रक्रिया बुधवार, 12 फेब्रुवारी पासून सुरू होेणार आहे. अधिक माहितीसाठी 9422772178, 9923442206 व 9860604295 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण पुनम भंगाळे देणार असून सहभागी स्पर्धक महिलांना भुसावळ रनर्स तर्फे वॉर्मअप, स्ट्रेचिंग व रनिंग चे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे शिवाय हे प्रशिक्षण पूर्णतः नि:शुल्क (मोफत) असेल. त्यासाठी दर मंगळवार, गुरुवार व रविवार रोजी सकाळी 5.30 ते 7 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी .एस ग्राउंड मैदान) येथे हजर रहावे, असे योग शिक्षिका पूनम भंगाळे यांनी सांगितले . . यावेळी डॉ.तुषार पाटील, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके, रणजीत खरारे व प्रवीण पाटील उपस्थित होते.



