भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

भुसावळ (प्रतिनिधी )-
श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात प्रथमतः मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. पसंती क्रमानुसार 160 मतदारांनी आपले मतदान केले. या निवडणुकीत पाच उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते.
चुरशीची झाली निवडणूक
निवडणुकीसाठी खुशबू युवराज पाटील, जयश्री अर्जुन पाटील, संयुक्ता शाम लाड, निशा देवेंद्र पाटील व धनश्री भागवत सोनवणे या उमेदवारांमध्ये चुरशीची निवडणूक झाली. यात धनश्री भागवत सोनवणे हिला अधिक मते मिळवल्याने तिला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. याबाबतची घोषणा भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केली. यावेळी डॉ.शुभांगी राठी यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची जबाबदारी व कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले.
कोटेचा महिला महाविद्यालय ते नगरपरीषद, भुसावळ या दरम्यान विद्यार्थिनींनी मतदान जनजागृतीच्या संदर्भात विविध घोषणा देत परीसरात जनजागृती अभियान प्रक्रिया राबविली.
पथनाट्यातून मतदानाचे आवाहन
याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जनजागृतीच्या संदर्भात पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात मतदान करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे याबाबत आवाहन करण्यात आले. या रॅलीत सर्व विद्यार्थ्यांनी टोप्या व भारत जोडो अभियानाच्या संदर्भात तिरंगा पट्टा गळ्यात घातलेला होता त्यामुळे ही रॅली विशेष आकर्षण बनली.
या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज यांनी केले. या रॅलीला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.शुभांगी राठी, डॉ.हेमंत नारखेडे, डॉ.जान्हवी तळेगावकर, चेतन अमोदकर, प्रा.वसंत खरे व प्रा.स्मिता जयकर यांनी सहकार्य केले. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जयश्री पाटील, संयुक्ता लाड, निशा पाटील, तेजश्री तायडे, वैष्णवी अडकमोल, चैताली चतुर या विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *