भुसावळात शांती नगरात आठ दुकानात चोरी ; अज्ञात चोरटयांन विरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शांती नगर भागातील पुखराज प्लाझा मधील चक्क आठ दुकाने रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान फोडून दहा हजार रोख व काही वस्तु घेऊन पलायन झाल्याची घटना सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी उघडकीस आली. कमलेश कन्हैय्यालाल चंदन ,वय,४०,धंदा – बेकर्स दुकान रा.वसंत टॉकीजचे मागे, मेथाजी मळा, चंदन लॉन्ड्री जवळ, भुसावळ यांनी फिर्याद दिली की , पुकराज प्लॉझा, दुकान नं. ८. शांती नगर , भुसावळ येथे प्रथमेश बेकर्स नावाचे दुकान आहे
दिनांक ०९/०२/२०२० रोजी सकाळी १० वा. नेहमी प्रमाणे माझे वरील दुकानावर गेलो व दुकान उघडले या दिवशी रविवार असल्यामुळे दुपारी ३ वा.सुमारास माझे दुकान बंद करुन शटरला कुलुप लावुन घरी निघुन गेलो होतो. त्यानंतर आज दि.१०/०२/२०२० रोजी सकाळी १० वा.सुमारास
नेहमी प्रमाणे दुकानावर गेलो असता दुकानाचे शटर एका बाजुने उचकटलेले दिसले त्यावेळी दुकानाचे लॉक उघडले व शटर उघडुन आत गेलो असता दुकानातील काऊंटरचे गल्ल्याची उचकापाचक झाली होती व गल्लयाचे ड्रावर उघडे होते. त्यावेळी गल्ल्यात ठेवलेल्या पैशांची खात्री करता तेथे पैसे दिसले नाही. तेव्हा खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानात चोरी केली आहे. यात ४०००/- रुपये. रोख त्यात १००,५०,२०,१० रु. दराच्या नोटा दुकानाचे काऊंटरचे गल्ल्यामध्ये ठेवलेले रोख रुपये दिनांक ०९/०२/२०२० रोजी दुपारी ३ ते दि. १० रोजी सकाळी १० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकवून
घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहे. म्हणुन अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद दीली आहे . तसेच दुकानाजवळ दुकान असलेले तुषार सरोदे, किशोर चिंचोले, नंदु जोहरी , किशोर वानखेडे, राहुल वाणी, दुर्गादास झोपे यांचे सुध्दा दुकानांमध्ये चोरी झाल्याचे समजले आहे.
या वरुन शहर पोलिसा ठान्यात गुरन 26/2020 क्रमांकाने भादवी 454,457,380, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे .
दरम्यान सर्व दुकानदार यांनी त्वरित शहर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली . चोरटे सी.सी.कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
भुसावळ शहरातील शांती नगर भागातील पुखराज प्लाझा मध्ये एकूण 9 दुकाने असून यातील प्रथमेश बेकर्स,दत्त डेअरी,बालाजी लेडीस,पूर्वा कलेक्शन, पालवी फॅशन,एस.आर.फोटो या दुकानाचे शटर वाकवून तर काही दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चार हजार रुपये रोख व मालाचे नुकसान केल्याची माहिती दुकानदारांनी दिली.तर के.जे.मेंटल्स,डॉ.पांगळे यांच्या दुकानाचे व दवाखान्याची शटर व कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला गेला.ही घटना दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान घडली.आपली दुकाने बंद करून गेलेल्या दुकानदारांना सकाळी ही घटना निर्दशनास आल्याने त्यांनी शहर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. शांती नगर भागातील पुखराज प्लाझा मधील दुकान फोडण्यासाठी दोघे चोरटे तोंडाला काळा कपडा बांधून आलेले असल्याचे सीसी कॅमेरा मध्ये दिसून आले त्यातील एकाने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून चार हजार रोख घेऊन पोबारा केला .
नजिक असलेली गोपाळ नगर पोलिस चौकी केवळ नावालाच राहिली असून याबाबत शहर पोलीस ठान्यात वारंवार सूचना देवून देखील या चौकीवर पोलिस कर्मचारी कधीच नसतात अश्या संतप्त सुर दुकानदार व नागरिकांचा उमटला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *