भुसावळ ते तरसोद ही पदयात्रा 12 नोव्हेंबर रोजी निघणार :

भुसावळ – लायन्स क्लब भुसावळ तर्फे दिनांक 8 नोव्हेंबर 2022 ला भुसावळ ते तरसोद ही पदयात्रा आयोजित केली होती परंतु त्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ही यात्रा पुढे ढकलून ती दिनांक 12 नोव्हेंबर 2022 या तारखेला सकाळी साडेसात वाजता भुसावळ येथील बालाजी मंदिरापासून निघणार आहे तरी भाविकांनी सदरची नोंद घ्यावी व दिनांक 12 नोव्हेंबरला ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे असे लायन्स क्लबचे पदयात्रा प्रमुख लायन्स डॉक्टर वसंत चौधरी यांनी कळविले आहे