भुसावळ शहरातील त्रिकूटाने बनावट चावीचा आधार घेत ७ लाखांचा कपडे लांबवले ; गुन्हा दाखल! –

जळगाव – भुसावळ शहरातील त्रिकूटाने बनावट चावीचा आधार घेत सात लाख २२ हजार ८८० रुपये किंमतीचे कपडे लांबवले. ही घटना बळीराम पेठेत घडली. या प्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, विशाल किसन बजाज (३३, रा. सिंधी कॉलनी) यांचे बळीराम पेठेत विधाता मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावर शिवम कलेक्शन नावाचे कापड विक्री दुकान आहे. दुकानापासून ५०० मीटर अंतरावर १५ नंबर शाळेजवळ गोदाम असून त्यात मोठ्या प्रमाणावर कपडे ठेवण्यात आलेअ आहेत. या दुकानात लक्की गिडवानीसह चार तरुण कामाला होते. १२ जुलै रोजी पंजाबमधून १२ लाख रुपयांचे टी शर्ट व इतर कपडे आणून ते गोदामात ठेवण्यात आले होते. या कपड्यांची विक्री होत नसल्याने पंजाब मेलने ते परत केले जाणार होते परंतु तत्पूर्वीच गोदामाच्या कुलूपाची बनावट चावी तयार करीत सात लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे तिघांनी लांबविले.

विशेष म्हणजे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी त्यांनी मेमरीकार्ड तोडले. या प्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा. भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.