भुसावळ – सध्या शिक्षणाचे पवित्र क्षेत्र भ्रष्टाचार, व गैव्यवहार यामुळे खूपच चर्चेत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा(टी. इ. टी.)मधील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार प्रकरण अद्याप सुरुच असताना आता तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री डी. पी.महाजन यांनी नियम बाह्य पद्धतीने जानेवारी२०१५ते डिसेंबर२०१९ दरम्यान शिक्षकांना दिलेल्या मान्यता रद्द करून त्यांची नोकरी समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.जळगाव जिल्ह्यात असे १२५शिक्षक असल्याची माहिती आहे.. चूक अधिकाऱ्यांनी करायची अन् शिक्षा मात्र शिक्षकांनी भोगायची हा कुठला न्याय?वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून पात्रता असलेले उमेदवार त्या संस्थेच्या मुलाखतीला जातात.त्यावेळी संस्थेच्या अंतर्गत बाबींची माहिती त्यांना नसतेच.संस्थेने रोस्टर ठेवले की नाही?अनुशेष भरलेला आहे किंवा कसे? त्या शाळेतील कोणते शिक्षक कधी निवृत्त झाले? ही व अश्या प्रकारची माहिती त्यावेळी त्यांना कशी असेल? सर्व सोपस्कार पार पडल्यावर संस्था त्यांना नेमणूक पत्र देते,अन् ते शाळेत रुजू होऊन आनंदाने मनापासून अध्यापणाला प्रारंभ करतात नंतर मुख्याध्यापक त्यांचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवतात. ही प्रशासकीय प्रक्रिया आहे व शिक्षकांचा ट्याचेशी काहीही संबंध नाही संस्थाचालक,/मुख्याध्यापक यांचीच ती जबाबदारी असते.शिक्षणाधिकारी प्रस्ताव तपासतात व मान्यता देतात किंवा नाकारतात.मान्यतेचे निकष कोणते ,कोणते कागदपत्रे हवेत,सर्व कायदेशीर आहेत की नाही हे तपासून मान्यता देणे किंवा नाकारणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे जबाबदारी आहे असे असताना शिक्षणाधिकारी जर आपल्या कर्तव्यात चुकत असेल नियमबाह्य मान्यता देत असेल तर त्यास तो अधिकारीच जबाबदार नाही का?शिक्षकांनी स्वहताने लिहून तर स्वतःची मान्यता आणलेली नाही ना?मग त्यांच्या चुकीची शिक्षा शिक्षकांना का म्हणून देत आहात कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!शासनाने त्यांच्याच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शिक्षेची कुऱ्हाड उचलण्याचे सोडून शिक्षकांचे संसार का म्हणून उद्ध्वस्त करीत आहे ?चोर सोडून सन्यशाला फाशी का? टी. इ. टी.परीक्षा घोटाळ्यात ही असेच झाले कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मोठ्या माशांना सोडुन गरीब शिक्षकांनाच बळीचा बकरा केले जात आहे हा अनुचित प्रकार शासनाने त्वरीत बंद करावा अन् आधी स्वतःच्या अधिकाऱ्यांना शिस्त लाऊन भ्रष्टाचाराची उघड उघड मांडलेली दुकाने बंद करायला हवी अन्यथा शिक्षणक्षेत्रात प्रचंड अराजक मजून त्याचे दुष्परिणाम सर्व समाजाला भोगावे लागतील असे प्र. ह.दलाल यांनी पत्रकार म्हटले आहे .



