माधुरिने खोवला भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा : सैन्य दलात निवड :

भुसावळ ( प्रतिनिधी):-

तालुक्यातील खडका येथील कु. माधुरी निवृत्ती वारुळकर हिची स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (Staff Selection Commission) माध्यमातून सैन्य दलात निवड होऊन 11 महिन्यांच्या प्रशिक्षण पूर्ण करून ती देश सेवेत रुजू झाल्याबद्दल खडका (Khadka) येथील गावकर्‍यांनी (villagers) माधुरीची घोड्यावरून (horse) डि. जे. च्या गाजावाज्यात व फटाके फोडत भव्य अशी मिरवणूक (Procession) काढली.

माधुरीचे बालपण हे सर्वसामान्य घरात गेले. लहानपनीत वडीलांचा मृत्यू झाल्याने तिला आजोबा बाळू लालू येवलकर, मामा दिपक, किरण व सतिश येवलकर यांनी खडका येथील ज्ञानज्योती विद्यालयात शिक्षण दिले. तिला तिच्या आजोबा व मामा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. तिने जिद्दीने आणि मेहनतीने शिक्षण घेऊन देश सेवेत जाण्याचे मनासी ठरवले व असम रायफलमध्ये अत्यंत खडतर असे ट्रेनिंग, जंगल ट्रेनिंग करून ती देश सेवेत रुजू झाली.

त्याबद्दल तिचा स्वागत समारंभ व मिरवणूकीचे आयोजन खडके गावात करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली व पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गणेश कॉलनी, गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन घरी मिरवणुकीची सांगता झाली.

प्रसंगी स्वागत समारंभ ही करण्यात आला. मिरवणूकी वेळी मार्गाने माता-भगिनी यांनी माधुरीचे औक्षण केले. खडका गावात डी.जे.वर देशभक्तीची गाणी तसेच फटाक्याच्या आतषबाजी आणि ‘भारत माता की जय’ या घोषणेने परिसर दुमदुमला होता. हे सर्व पाहून व माधुरीच्या यशामुळे आजी-आजोबा, आई, भाऊ-वहिनी, मामा-मामी यांचे मन भारावून आले होते.

यावेळी माजी सरपंच चुडामण भोळे, भैय्या महाजन, सरपंच सुपडू महाजन, माजी ग्रा.पं.सदस्य नितीन वराडे, निवृत्ती बरकले, गोकुळ पाटील, श्याम सिंग पाटील, ज्ञानेश्वर आमले व गावकर्‍यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.