राज्य विज्ञान महामंडळाच्या सल्लागार पदी किशोर राजे तर सहसचिव पदी सुनील वानखेडे यांची निवड


जळगाव
विज्ञान अध्यापक महामंडळ राज्य कार्यकारणीत जळगाव जिल्ह्यातील दोघांना संधी मिळाली असून दोघांचा समावेश करण्यात आला आहे राज्य विज्ञान महामंडळाच्या सल्लागारपदी जळगाव येथील किशोर राजे तर वरणगाव ता भुसावळ येथील सहसचिव पदी सुनील वानखेडे यांची निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे नुकतीच विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत तीन वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जेष्ठ शिक्षणतज्ञ व महामंडळाचे माजी कार्यवाह डॉ. अ.ल. देशमुख माजी अध्यक्ष के एस पानसे प्रकाश खोचीकर कार्यवाह अरुण मुळे व राज्यभरातून मोठ्या संख्येने जिल्हा विज्ञान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे यांची राज्य महामंडळाच्या सल्लागारपदी तर सचिव सुनील वानखेडे यांची महामंडळाच्या सहसचिवदी निवड करण्यात आली विज्ञान चळवळ महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली
कार्यकारणी पुढील प्रमाणे
प्रमुख मार्गदर्शक दत्तात्रेय आरोटे अध्यक्ष दिनेश पवार (नाशिक) कार्यवाह रोहिदास एकाड (पुणे) कोषाध्यक्ष प्रमोद कुवर (धुळे) उपाध्यक्ष श्रीशैल्य मठपती (कोल्हापूर) शिवाजी चापले (सोलापूर) संभाजी शिंदे (सांगली) डॉ. रवींद्र भास्कर (अकोला) सहकार्यवाह रवींद्र इनामदार (रत्नागिरी) सुनील वानखेडे (जळगाव) अनिल पाटील (रायगड) पांडुरंग काकतकर (सिंधुदुर्ग) कार्यकारणी सदस्य प्रशांत पंचभाई (यवतमाळ) रवींद्र स्वामी (उस्मानाबाद) विलास पोटफोडे (नागपूर) संतोष पावडे (पालघर) बद्रीनाथ शिंदे (अहमदनगर) सल्लागार मंडळ डॉ. अ.ल. देशमुख अरुण मुळे प्रताप थोरात किशोर राजे अरुण गायकवाड लक्ष्मीप्रसाद मोहिते.