भुसावळ – ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ मध्ये “आझादी का अमृत महोत्सव” च्या माध्यमातून “फिट इंडिया फ्रीडम रन” आयोजन करण्यात आले

कार्यक्रमाची सुरवात सायकल रॅली ने करण्यात आली रॅली चा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीना कटलर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरवात केली
त्यानंतर ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रमात रनिंग ची सुरवात करणार आली, रनिंग करता करता “स्वच्छ भारत सुंदर भारत” या घोषणा देत शाळेचा परिसरातील कचरा गोळा करीत परिसर स्वच्छ करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी मुख्याध्यापिका सौ.नीना कटलर मार्गदर्शक स्काऊट गाईड शिक्षक निलेश फंड ,अनिता कोळी तसेच शाळेचे क्रीडा शिक्षकगण विजय सकत , अर्जुन सनस , गोपाल जोनवाल , डॅनियल पवार , राहुल सोनवणे ,अनघा पाटील यांचा सहभाग मोलाचा होता.


