भुसावळात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त उपक्रम…..

भुसावळ – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विधी सेवा समिती भुसावळ व साईलीला महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रानातला महादेव मंदिर या ठिकाणी महिलांसाठी “महिलांनी मानसिक आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाय “या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रा. भाग्यश्री भंगाळे व ॲड. जास्वंदी भंडारी हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उषा वायकोळे यांनी भूषवले
‌‌ महिलांनी मानसिक आरोग्यासाठी ध्यान साधना करावी सकारात्मक विचार ठेवावे, नैराश्याच्या आहारी न जाता प्रबळ इच्छाशक्ती ठेवावी ज्यामुळे शरीरही निरोगी राहील व्यायाम ,योगा यामुळे ही मानसिक आरोग्य चांगले राहते स्वतःमध्ये बदल घडवून द्वेष मत्सर बाजूला सारून आनंदी राहिले तर आपण इतरांनाही आवडू असे यावेळी डॉ. भाग्यश्री भंगाळे म्हणाल्या
ॲड. जास्वंदी भंडारी यांनी मानसिक आजाराची लक्षणे कोणती व यातून समुपदेशकांच्या मदतीने नैराश्यातून कसे बाहेर निघता येईल याविषयी मार्गदर्शन केले वरिष्ठ महिलांची उपस्थिती अधिक असल्यामुळे जेष्ठ नागरिकांचे कायदे व योजना याविषयी मार्गदर्शन केले
अध्यक्ष उषा वायकोळे यांनी आजच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच सर्वांमध्ये सकारात्मक बदल घडेल आणि नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत अश्या कार्यक्रमांमधून होते म्हणून असे उपक्रम नेहमी होत राहावे असे मत व्यक्त केले
कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय सुनिता अनिल राणे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा राणे यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती श्रीगोंदेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साईलीला महिला बचत गटच्या सदस्या सौ सुनीता राणे , रेखा धुपे, प्राजक्ता गंधे हर्षदा चौधरी ,अनिता राणे यांनी मेहनत घेतली हुडको कॉलनी च्या महिलांची कार्यक्रमाला उपस्थिती होती