श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 सप्टेंबर रोजी अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जयंतीदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला . ह्या निमित्य महाविद्यालायाच्या आय.एस.टी.ई. आणि आय. क्यु.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने गट चर्चा, वक्तृत्व स्पर्धा आणि इंग्रजी भाषा प्रभुत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून भावी अभियंत्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या एकूणच व्यक्तीमत्वातून समर्पण, चिकाटी, प्रामाणिकता आणि अभ्यासाचे सामाजिक बदलासाठीचे उपयोजन हे गुण ग्रहण करत राष्ट्र बांधणीसाठी सरसावले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान निकिता भाम्बरी,खुशबू चौधरी, रिया चोपडे, प्राजक्ता चिनावलकर, साक्षी ताडे, नयन चान्द्वानी,आफरा खान ह्या विजेत्यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, आय. क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, आय.एस.टी.ई सचिव प्रा.प्रशांत बजाज डॉ. अजित चौधरी, , प्रा.ए. व्ही. पाटील, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.एस. बी. ओझा, ,डॉ.दिनेश पाटील प्रा.डि. जी. अग्रवाल, आय.एस.टी.ई समन्वयक डॉ. प्रिती सुब्रमण्यम,प्रा. जितेंद्र चौधरी, प्रा. नितीन खंडारे, प्रा.सुलभा शिंदे, डॉ.श्रीकांत चौधरी, प्रा.गिरीश सोनवणे, प्रा.मनीष माटा, प्रा.राहुल चौधरी, प्रा. किशोर चौधरी यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.