भुसावळचे शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्ली येथील प्रदर्शनात झळकले.

भुसावळ – भयY6JJसावळचे शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्ली येथील प्रदर्शनात झळकले.
१३५ कलाकृतीची झाली निवड. भुसावळ सह सर्वत्र कौतुक.
शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्लीत प्रदर्शनात झळकले.
अंजिंठा लेणीतील छायाचित्रांची झाली निवड. त्यामुळे भुसावळचे नाव सपूर्ण देशात पोहोचले
आणि
प्रदर्शनातील ऐतिहासिक छायाचित्र व विवीध प्रकारात देशभरातून १६०३ फोटोग्राफरांनी आपली छायाचित्रे पाठवली होती. त्यातील १३५ जणांच्या २ बाय ३ फूट आकारातील छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्यात भुसावळातील प्रसिद्ध छायाचित्रकार शंभू मेहेंदळे यांनी काढलेले अजिंठा लेणीवरील छायाचित्र झळकले.
शंभू मेहेंदळे यांनी या प्रदर्शनासाठी कोल्हापूरचे शाहू पॅलेस,रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, वाराणसी येथील करवटकाशी,शहाड़ येथीलWT बिर्ला मंदिर व मासेमारीचे छायाचित्र सादर केले होते.
केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय व ललितकला अकादमीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. देशभरातून बहूतेक फोटोग्राफरांनी यात फोटो पाठवले होते.
या प्रदर्शनासाठी १६०३ कलाकृती सादर झाल्या. यापैकी १३५ कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात खान्देशातून एकमेव भुसावळातील छायाचित्रकार अभिराम (शंभू) मेहेंदळे यांच्या अजिंठा लेणीतील बोद्घ भिक्षुक हे मोबाईल मध्ये फोटो टिपत असल्याचे छायाचित्र काढले होते.या छायाचित्राला चांगली प्रसिद्धी मिळाली.
शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्ली येथे प्रदर्शनात प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांचे भुसावळातील सीनियर फोटोग्राफरां तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी नरसिंग राठोड,अविनाश साळी,गोकुळ महाजन,राजेंद्र जावळे,श्याम गोविंदा,गणेश राठोड,भरत शिंपी, मुकेश नेवे सह इतर मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल शंभू मेहेंदळे हे भाराऊन गेले व त्यांनी सर्वांचे आभार मानले.