भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली व श्री कृष्ण गणेशोत्सव मंडळ आयोजित स्पर्धा घेण्यात आल्या.
निरोगी जीवन शैली साठी बाहेर चे खाणं टाळुन पोषण सप्ताह साजरा करण्यात आला, खजुर, शेंगदाणे चिक्की,राजगीरा लाडू, ग्लुकोज बिस्किटे वाटप करण्यात आले.
लिंबू चमचा, बोरी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कॅरम स्पर्धा, उंच उडी स्पर्धा, जिलेबी तोड स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या.
त्या वेळी आमदार संजय सावकारे,रजनी सावकारे,महेश फालक,अनिकेत पाटील,देवा वाणी,दिनेश राठी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली अध्यक्ष नुतन हिरामण फालक यांनी बक्षीस वितरण केले. त्या वेळी सेक्रेटरी मनीषा पाटील,रश्मी शर्मा, सुधीर शर्मा,मुकेश अग्रवाल,हिरामण फालक आदींची उपस्थिती होती.



