भुसावळ -शहरात खंडित वीज पुरवठ्याबाबत शिवसेनेतर्फे अभियंत्यास निवेदन देण्यात आले तसेच
या पुढे लाईट जाण्याचे प्रकार असेच सुरू लहील्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला .
शहरात रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी उसंथ घेतली. अचानक रात्री पासून वीज पुरवठा खंडित झाल्याने अेनक नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. बराच काळ वीज नसल्याने घरकामाला देखिल विलंब झाला.
काही काळानंतर महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. रात्री ३ वाजता काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र काही भागात सकाळी तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने पावसाळ्यातील विजेचा लंपडावाला सुरूवात झाली की काय असा प्रश्न नागिरकांना पडला आहे. महावितरण वीज कंपनीच्या भुसावळ येथील कार्यालयात संपर्क केला असता, वीज पुरवठा पूर्ववत होण्यास पाच ते सहा तास लागतील असे उत्तर मिळाले. नंतर त्यांनीही मोबाईल बंद करून ठेवला.
याबाबत महावितरण कंपनीचे अभियंता यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही तर महाजन साहेबाना फोन लावला तर त्यांनी सदर भागातील तीन ते चार ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम चार-पाच तासात होईल असे सांगण्यात आले.
भुसावळ शहरात वारंवार छोट्या मोठ्या पावसात वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त होत आहे. सर्व ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करावी जेणेकरून पुढील काळात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार नाही त्याच प्रमाणे गडकरी नगर मधील नवीन पाण्याच्या टाकी जवळ मधील डीपी मध्ये सत्यात्याने नादुरुस्त होत आसते त्यामुळे या भागातील दिपी सुध्दा तात्काळ बसवण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली
तसेच भिलवाडी भागामध्ये आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास झाडाची फांदी तुटल्याने वीज तार तुटून भिलवाडी मधील घरावर्ती पडली वीज कंपनी ला फोन केला असता ४ तासांनी तेथे कर्मचारी आले तोपर्यंत तेथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन घरा बाहेर थांबले असले प्रकार या मुढे खप युन घेतले जाणार नाही असा इशारा शहर प्रमुख दिपक धांडे यांनी दिला
तसेच मोहित नगर व साईबाबा मंदिर जवळ नवीन डीपी व ट्री कटिंग ची मागणी शिवसेना शहर उप प्रमुख स्वप्नील सावळे व योगेश बागुल यांनी केली
तसेच कंडारी गावातील डिपी सुध्दा बळवण्यात यावी अशी मागणी शीशक सेनेचे विनोद गायकवाड यांनी केली
या पुढे लाईट जाण्याचे प्रकार असेच सुरू लहील्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा
शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे शिवसेना शर प्रमुख हेमंत खंबईत,विधानसभा शेत्राप्रमुख निलेश महाजन,नगर सेवक मुकेश गुंजाळ,सोनी ठाकूर राकेश खरारे,पिंटू भोई,विनोद गायकवाड,कैलाश लोखंडे,कडू चौधरी,योगेश बागुल,मनोज पवार, स्वप्नील सावळे,मेहमूद शेख काळू, व कार्यकर्ते यांनी दिला आहे



