भुसावळ – संकटकाळी धावून रक्तदान करून रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदात्यांचा सहृदय सन्मान मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजता शिव मंडळ व शिवसेना भुसावळतर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मोटुमलजी चौक, जामनेर रोड, भुसावळ येथे करण्यता येणार आहे.

भुसावळ परीसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित असतील.धाववळीच्या युगात अपघात, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता भासते मात्र त्या तुलनेने रक्तदात्यांचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत अधिक जनजागृती व्हावे व रक्तदान करणाऱ्यांचा अधिक हुरूप वाढावा यासाठी रक्तदात्यांचा सहृदय सन्मान मंगळवारी करण्यात येत आहे.
रक्तदान करुन रुग्णांना जीवनदान देणाऱ्या दात्यांसह रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या ग्रुप संयोजकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी तसेच स्वच्छतेने रक्तदान करण्यासाठी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कट्टर शिवसैनिक तथा संयोजक उमाकांत (नमा) शर्मा यांनी सांगितले.


