भुसावळ – कोलते फाउंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूल भुसावळ मध्ये श्री कृष्ण जन्मा निमित्त दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आला.

त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या व राधेच्या विविध वेशभूषा परिधान करून विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करत दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला शाळेचे मा.रोहित कोलते सर, व शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट मॅडम या मान्यवरांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व बाल गोपालांना श्री कृष्ण जन्मा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


