भुसावळ – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण भारत देशात उत्साहाने साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर येथील आमदार संजय सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे देशभक्ती वर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , त्यात भुसावळ शहरातील वेगवेगळ्या संस्थेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला त्याच बरोबर प्रतिष्ठा महिला मंडळ च्या सदस्यांनी व इतर सर्व संस्थानीं मिळून भारतातील विविध राज्याची वेशभूषा सहित तेथील संस्कृतीचे दर्शन धडविले
या कार्यक्रमात 7 वर्षाच्या छोट्या चिमुकली पासून ते 90 वर्षाच्या आजी बाई उत्साहाने सहभागी झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
आमदार संजय सावकारे,डॉ सौ रश्मीजी शर्मा, डॉ सौ संगीताजी बियाणी, डॉ सौ निलिमाजी नेहते, डॉ सौ मीनाक्षी वायकोळे,श्री राजीवजी शर्मा, मकरंद नारखेडे, विकास पचपांडे यांच्या हस्ते गणेश पूजन, भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव निम्मित आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी भुसावळच्या महिलां करीता त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या माध्यमातून शहरात देशभक्ती चा संदेश जावा या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी सर्व मुली,महिला वर्ग व सहभागी संस्थेचे त्यांनी आभार व्यक्त केले, तसेच सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळे येणाऱ्या पुढील वर्षात पण असेच देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले.या कार्यक्रमात भुसावळातील जवळ पास 150 महिलांनी सहभाग घेतला.
अहिल्यादेवी कन्या शाळेतील मुलींनी दहीहंडी व महाराणा प्रताप विद्यालयातील विध्यार्थ्यांनी भारतातील महापुरुष व स्त्रियांचे वेशभूषा करून उपस्थितांचे मने जिंकली.सिल्वरलाईन स्पोर्ट्स अकादमी च्या मुलांनी स्केटिंग वर देशभक्तीपर गीतावर अप्रतिम सादरीकरण केले.सगळ्यात छोटी चिमुकली नुपूर भालेराव ने गणेश वंदना व देशभक्तीपर नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांचा उत्साह पण ओसंडून वाहत होता त्यांनी पण दोन आगळे वेगळे परफॉर्मन्स सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.रोटरी चे सदस्य डॉ नितीनजी दावळभक्त यांनी सुंदर गीत सादर केले.तथा सर्वांच्या आग्रहाखातर आमदार श्री संजयजी सावकारे यांनी पण अप्रतिम देशभक्तीपर गीतगायन केले.
सहभागी संस्थेचे नावे
1)इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी
2)रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी
3)महिला पतंजली योग समिती
4)पर्यावरण सखी मचं
5)वसुंधरा जायंट सहेली ग्रुप
6)अनुज ट्रेंनिग सेन्टर
7)महिला क्रीडा मंडळ
8)जय गणेश जेष्ठ नागरिक संघ
9)अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ
10)पिंकेथॉन
11)माहेशवरी महिला मंडळ
12)आखीलभारतीय मारवाडी महिला मंडळ
13)जे सी आई भुसावळ ताप्ती
14)सिंधी समाज ग्रुप
महिलांच्या प्रतिक्रिया
शालेय जीवना नंतर आज सादरीकरण करण्याची संधी मिळाली
नेहमी शाळेत आमचे मुले सादरीकरण करत असतांना आम्ही त्यांचे मोबाईलवर शुटिंग करायचे, पण आज या कार्यक्रमात आम्ही परफॉर्मन्स देत आहोत आणि आमची मुले शुटिंग करीत आहे
पहिल्यांदा स्टेज वर सादरीकरण करायला मिळाले,खूप वर्षा नंतर मनसोक्त आनंद मिळाला.
भुसावळातील सुप्रसिद्ध आदरणीय खपली सर,सौ दीपा पटेल,सौ शीतल भराडीया,कुमारी ऐश्वर्या ,कुमारी आरती व सागर सर यांनी महिला कडून सुंदर नृत्य कारावून घेतले.
3 तास चालत असलेल्या या कार्यक्रमाला एकसूत्रात बांधून ठेवत सौ अलका भटकर ,सौ वर्षा लोखंडे व राजश्री देशमुख यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडण्यात मंडळाच्या सदस्य सौ लता सोनवणे,सौ मनीषा काकडे,सौ सरला सावकारे, सौ अनिता आंबेकर,सौ जयश्री चौधरी,सौ सुनंदा भारुळे यांनी परिश्रम घेतले.



