जिल्हा स्तरीय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलीटरी स्कूलचे वर्चस्व :


भुसावळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरित आंतरशालेय नेहरू चषक १५ वर्षाआतील मुलांच्या व १७ वर्षा आतील मुल आणि मुलींच्या स्पर्धेला जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी उद्घाटन केले.यामध्ये बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळचे संघ विजेता ठरले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य ए. जेस्सी यांच्या हस्ते .यावेळी उपस्थिती होती.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हॉकी प्रशिक्षक अरविंद
खांडेकर यांनी केले. विजेत्या दोन्ही संघाचे
बियाणी मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष मनोज बियाणी तर सचिव डॉ सौ संगीता बियाणी यांनी कौतुक केले सदर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक एच.एन.पाटील व प्रशिक्षक युसुफ खान, तौशिफ कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धकांची विभागीय स्तरावर झाली असून ते नाशिक येथे खेळण्यासाठी जाणार आहे.

मुलींची स्पर्धेचा निकाल –
उपांत्य सामने बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वि. ताप्ती पब्लीक स्कूल भुसावळ यात ताप्ती पब्लीक स्कुलला ३/1 ने बियाणी पब्लीक स्कुल ने हरवले.

■ अंतीम सामना बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वि बोहरा सेट्रल स्कुल पारोळाला ३/० ने हरवले.

मुलांच्या उपांत स्पर्धेचा निकाल –
बियाणी मिलिटरी स्कूल विरुद्ध बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा, यात बियाणी मिलिटरी स्कूलने बोहरा सेंटर स्कुलला ३/१ ने हरविले.

अंतिम सामना मुलांच्या स्पर्धेचा निकाल
बियाणी मिलिटरी स्कूल विरुद्ध बी झेड उर्दू स्कूल भुसावळ, यात बियाणी मिलिटरी स्कूलने ४/२ ने हरविले.
सदर स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल चा १५ वर्ष आतील मुलांचा संघ उपविजेता तर १७ वर्षा आतील मुल व मुलींचा संघ विजयी ठराला असून त्याची विभागीय स्तरा साठी दोन्ही संघ पात्र ठरले .