भुसावळ (प्रतिनिधी )-
वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेली आठ डब्यांची मेमू ट्रेन अखेर दि. १ रोजी सकाळी ६.३० गाडी क्र. ६११०१ भुसावळ- नरखेड- बडनेरासाठी रवाना झाली.यावेळी प्रवाशांनी नवीन मेमू ट्रेनचे स्वागत केले.
वरिष्ठ मंडल गृह आणि पर्यावरण प्रबंधन रामचंद्रन तसेच वरिष्ठ मंडळ यांत्रिक इंजिनीयर लक्ष्मीनारायण, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते गाडीचे गार्ड जी. एम. वारके तर चालक जे. एस. सहाणी आदी अधिकारी उपस्थित होते. अप आणि डाऊन मार्गावर ही गाडी धावणार आहे. ही गाडी मुंबई लोकल सारखी दिसणारी असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहे. डब्यांच्या दोन्ही बाजूस अद्ययावत इंजिन असल्याने आता इंजिन बदलण्याची गरज भासणार नाही. दरम्यान सकाळी मेमू ट्रेन रवाना होण्यापूर्वी ती सजविण्यात आली होती. भुसावळ येथून यशस्वीरित्या गाडीचे प्रस्थान झाले.



