भुसावळ तालुक्यातील विकास कामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर.

भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्‍या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविण्यात येत आहे .या योजने अंतर्गत नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती,गावांच्या विकासासाठी आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा करून सुचवलेल्या कामांना मान्यता देण्यात आली आहे मंजूर झालेल्‍या कामांमध्ये वराडसीम,काहूरखेडा,दर्यापूर व खडका येथील मागासवर्गीय वस्तीला जोडल्‍या जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रत्येकी गावाला १५ लाख असे एकूण ६०लाख,कुऱ्हा येथील मागासवर्गीय वस्तीत डांबरीकरण करणे १५ लाख,सुसरी येथे बेघर वस्तीमधील रस्ता डांबरीकरण १५ लाख,आचेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत शौचालय बांधणे १० लाख, असा एकूण १कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना लवकरच चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *