भुसावळ (प्रतिनिधी)-
सर्वांगीण व चिंतामुक्त आरोग्याकरीता सूर्यनमस्कार सर्वोत्तम आसन आहे . योगशास्त्रात सूर्यनमस्काराचे सर्वाधिक महत्व असून यात जवळपास 8 आसनांचा समावेश आहे असल्याने इतर आसन न करता दररोज केवळ सूर्यनमस्कार (अष्टांगासन ) केल्यास व्यक्ति संपूर्ण दिवस आनंदी उत्साही राहतो असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. क्रीडा भारतीद्वारे २ जानेवारी रविवार रोजी सकाळी ६:३० वाजेला सामूहिक सूर्य नमस्कार बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी एस ग्राउंड), येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .या वेळी आमदार बोलत होते . प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे व जीवन ज्योती फाऊंडेशनचे संस्थापक गोपाल सोनवणे हे होते. कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून प्रारंभ झाला . वेळी राजेंद्र कुलकर्णी यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व विषद केले. शहरातील सुमारे तीनशे स्त्री-पुरुष नागरिक कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सूर्यनमस्कार घालण्याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन चेतन क्षिरसागर,श्रीमती किरण जावळे प्रात्यक्षिकांसह केले यावेेळी क्रीडा भारतीचे अध्यक्ष ब्रिजेश लाहोटी यांचेसह भारत विकास परिषद , प्रतिष्ठा महिला मंडळ , जय मातृभूमि क्रीड़ा संकुल , स्वाभिमानी भारत मंच (पतंजली ), भुसावळ रनर्स असोसिएशन , इंडियन मेडिकल असोसिएशन, राधाकृष्ण प्रभात फेरी , रा. स्व . संघ यांचेसह शहरातील विविध 30 ते 35 संस्था व संघटनां सहभागी झाल्या होत्या . नागरिकांसाठी सूर्यनमस्कारांचे आयोजन हा उपक्रम प्रथमच राबविन्यात आला या आधी किमान 12 ते 13 वर्ष पासून उपक्रम शालेय विद्यार्थ्यां करिता घेण्यात येत होता .यंदा विद्यार्थ्याकरिता 5 फेब्रूवारी रोजी डॉ बाबासाहेब मैदानवरच आयोजन करण्यात आले आहे .
यावेळी आय एम ए चे डॉ वीरेंद्र झांबरे, डॉ. गोपाळ सोनवणे,क्रीडा भारती भुसावळ महिला अध्यक्ष सौ ज्योती सोनवणे, रा.स्व.संघ कार्यवाहक योगेश मांडे, कार्यकारिणीचे हर्षल सपकाळे,किशोर शिंपी, पवन फालक, वैभव पुराणिक क्रीडा शिक्षक राजीव कुलकर्णी आदी उपस्थित होते .



