रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स चा पदग्रहण समारंभ उत्साहात : नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे तर सचिव सागर विसपुते :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे आणि सचिव म्हणून सागर विसपुते यांनी पदभार स्वीकारला.
या पदग्रहण समारंभाला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे यांनी मावळते अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच मावळते सचिव ऍड विनोद तायडे यांनी नवनिर्वाचित सचिव सागर विसपुते यांना सचिवपदाची सूत्रे सोपवली.
मावळते अध्यक्ष राजेंद्र यावलकर मागील वर्षात राबविलेल्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती देत केलेल्या कामाचा आढावा दिला. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे यांनी “होय आम्ही रक्तादूत” या रक्तदान संबंधी उपक्रमाची सुरुवात केली. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण असे विविध उपक्रम घेणार असल्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ.उल्हास पाटील यांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केले आणि गोदावरी फाऊंडेशन व हाँस्पिटल च्या माध्यमातुन ग्रामिण भागात विविध मेडिकल कँम्प रोटरीच्या माध्यमातुन करावे असे आवाहन केले त्यासाठी मेडिकल स्टाफ व मेडिकल व्हँन उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले तसेच प्रत्येक घरामध्ये सुजाण नागरिकांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सिस्टीम लावावी आणि वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन करावे असे आव्हान केले.
रोटरी भुसावळ राँयल्स च्या मागिल वर्षातिल कार्यक्रमांचि व भविष्यात होणार असलेल्या कार्यक्रमांचि त्यांनी प्रशंसा केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटे. राजीव शर्मा यांनी रोटरीबाबत मोठी स्वप्न बाळगा व रोटरीच्या माध्यमातुन आपले नाव मोठे करा असा संदेश सर्व रोटरी सदस्यांना दिला.
पदग्रहण सोहळ्यात एकुण 12 नागरीकांनी रोटरी राँयल्स चे सदस्यत्व स्विकारले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रो.गिरीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.