भुसावळात प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी केले कापडी पिशव्याचे वाटप ;


भुसावळ – येथील महिलांच्या विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थाच्यांवतीने प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त महिलानी प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी शहरात ठिकठिकाणी कापडी पिशव्याचे वाटप करून जनजागृती करून पर्यावरण वाचवा असा संदेश दिला .
शहरात नहाटा कॉलेज परिसर , हॉटेल प्रीमियर ते
जामनेर रोडजवळ महिलांनी सकाळी 7 वाजेचे सुमारास हातात वेगवेगळ्या प्रकारचे संदेश फलक ज्यात प्लास्टिक पिशव्या वापरू नका संदेश देत कापडी पिशव्या चे वाटप केले
यावेळी समाज सेविका शैला ताई सावंत, उपाध्यक्ष मंदाकिनी केदारे , तसेच पर्यावरण प्रेमी
अंजली वाघमारे, वर्षा लोखंडे,सुनंदा शिरसाठ,
आरती खांडवेकर,सुनंदा खंबायत
विशाखा पाटील,हेमलता चौधरी
मीना ढाके,प्रणीता देशपांडे,शितल सावदेकर, वैशाली बेर्डे,सुनीता मीश्रा,माला चौधरी,
सुरेखा पाटील,उषा मोरे,सारीका फालक ,प्रतीभा माळी यांचेसह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या .