भुसावळ – येथील कला,विज्ञान,आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून कोविड _19 च्या काळात महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिलेली होती.परंतु महाविद्यालयात प्रवेश घेणारा बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातला असल्याकारणाने शेतकरी शेतमजुरांचा मुलगा,मुलगी असल्या कारणाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आढळून येत नाही,नेट मिळत नाही आणि म्हणून प्रवेश घेत असताना अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाने आणि प्रवेश समितीने सर्वानुमते असा निर्णय घेतला की, विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता परंपरागत पद्धतीचा वापर करून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात यावा त्या अनुषंगाने प्रथम वर्ष कला, वाणिज्य,विज्ञान, बी.बी.ए,बी.एम. एस.,या सर्व वर्गांसाठी प्रवेश ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेले असून ग्रामीण तसेच शहरी भागातील बहुतांश विद्यार्थी प्रवेश घेत आहेत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी महाविद्यालयाच्या वाचन कक्षात प्रवेश समितीचे सर्व सदस्य विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे मार्गदर्शन करीत आहेत महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेशाचे 60 ते 70 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले असून महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रवेश समितीचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही. वायकोळे,उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील,डॉ.बी.एच. बऱ्हाटे,डॉ.एन. इ.भंगाळे व प्रवेश समितीचे सर्व सदस्य आणि प्राजक्ता बागुल यांनी केलेले आहे.



