डॉ सुनील पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळ – शिवसेना पक्षप्रमुख, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तळवेल सरपंच डॉक्टर सुनील पाटील यांनी विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला .
विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिक्षकसेना माजी जिल्हाप्रमुख गजानन निळे, उपसरपंच उल्हास भारसके, तालुका उपसंघटक प्रकाश कोळी, युवासेना उपतालुकाप्रमुख रमेश धरणे, विभागप्रमुख किशोर कोळी, शाखाप्रमुख शंकर पाटील, उपशाखाप्रमुख संदीप पाटील उपस्थित होते.
शिवसेनेला उभारी मिळणार:
शिवसेनेने अशी अनेक संकटे पचवली असून प्रत्येक वेळेस उभारी मिळालेली आहे. संकटांचा सामना कसा करावा, याची पूर्ण कल्पना प्रत्येक शिवसैनिकांना असून पक्ष पुन्हा बळकट करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने कार्य करावे असे सुरेश राणे म्हणाले.