जळगांव – येथील कांचन नगर असोदा रोड भागातील महिले विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून तब्बल सात महिन्यापर्यत महिला आरोपी फरार होती.आजरोजी जैनाबाद मधून फरार महिलेला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की,दिनांक.10.12.2021 रोजी सपना सागर पाटील वय 23,रा.कांचन नगर असोदा रोड जळगाव येथील महिले विरुद्ध जळगांव एमआयडीसी पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार बाबत एम आय डी सी पोस्टे गुरुन नं. 764 / 2022 भादवि कलम 363, 376, 342, 212,109 प्रमाणे बाल लैंगिक अधिनियम कलम 4,8,12,17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्या घडल्यापासून महिला सात महिने फरार होती.पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शीकारे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून महीला आरोपी हीस दिनांक 08.06.2022 रोजी पहाटे 07 वाजता जळगाव शहरातुन जैनाबाद भागातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,सहा पोलीस अधिक्षक कुमार चिंथा जळगाव भाग यांचा मार्गदर्शनखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाडे,सफौ आनंदसिंग पाटील, पोना दत्रात्रय बडगुजर, पोना विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, पोकॉ छगन तायडे व महीला पोकॉ सपना येरंगुठला अशांनी केली आहे.
<


