पर्यावरण दिनानिमित्त कस्तुरी नगरात वृक्ष वाटप प्रभाग 23 हिरवेगार करणार : शिशिर जावळे यांचे प्रतिपादन :

भुसावळ :- येथील पर्यावरण जागर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष तथा निसर्ग पर्यावरण व सामाजिक प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री नाना पाटील सर व तथा राज्याचे सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील, शिशिर जावळे अध्यक्ष साई निर्मल फौंडेशन यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक 23 मधील कस्तुरी नगरातील श्री नंदेश्वर महादेव मंदिर परिसरात नागरिकांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक श्री नाना पाटील सर यांनी परिसरातील नागरिकांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी याप्रसंगी प्रभाग क्रमांक 23 हिरवेगार करणार असल्याचे प्रतिपादन मनोगतातून याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मनीष महाले, संजय मोराणकर, प्रभाकर पवार,गणेश साळुंके नंदकिशोर साळुंके, बबलू साळुंके,नितीन चौधरी, राहुल पुरी,राहुल कासार, किरण पवार, दीपक चौधरी, महेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी याप्रसंगी वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली.