श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेह्सम्मेलन उत्साहात :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2022 ह्या नावाने वार्षिक स्नेह्साम्मेलन उत्साहात साजरे करण्यात आले. ह्या दरम्यान आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्षादरम्यान केलेल्या विशेष शैक्षणिक कामगिरीचा वार्षिक गौरव सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून सचिव श्रीमती. मधुलता शर्मा हे मान्यवर हजर होते. मंचावर कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष ॲड.एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, बिसन अग्रवाल,पंकज संड, कीर्ती संड, ॲड. संजय जोशी, कैलाश शर्मा, प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ दिनेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अहवाल वाचन करताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्षादरम्यान मिळवलेले यश आणि विविध क्षेत्रात केलेली प्रगती याबाबतची माहिती दिली. रोजगार मिळणे इतकाच संकुचित दृष्टीकोन न ठेवता आपल्या महाविद्यालयातील भावी अभियंते रोजगार निर्मिती कशी करू शकतील असा विचार करून आम्ही विविध उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण,प्रात्यक्षिक,खेळ, मनोरंजन आणि वाचन यांचा संतुलित समन्वय यशस्वी जीवनासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी ह्या प्रसंगी केले.
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमात विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.