शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचे भुसावळात जंगी स्वागत : शिवसैनिकांनी केला सदहृदय सत्कार :


भुसावळ – शिवसेना संपर्क अभियान दरम्यान भुसावळात जिल्हादौऱ्यावर आलेले कोल्हापुर येथील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचे येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जंगी स्वागत करून सदहृदय सत्कार केला .

शिवसंपर्क अभियानाचे बैठकी प्रसंगी कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यासह शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, जळगावचे माज़ी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, अरुण सालुंखे, मनोज पवार 2022 शिवजयंती सम्मान चिन्ह, शाल-श्रीफल, तसेच चाँदीची प्रतिमा भेंट स्वरूप देवून खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार केला .
प्रसंगी महिला आघाडी संपर्क प्रमुख उषाताई मराठे , जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख प्रा उत्तम सुरवाडे, यांचेसह शिवसेना संपर्क अभियान संपर्क प्रमुख राकेश कांबळी , गिरीश विचारे , संजय बच्छाव , आबासाहेब पतंगे ,
मिलिंद धनकुरकर , नंदू राणे , संदीप चरफडे, मिलिंद रावराने, राकेश भाटकर , विलास रेडकर , अजित आझम , बबन धीरोडकर , सहदेव तारी ,आदीं पदाधिकारी उपस्थित होते .