माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसा वितरण ..शिशिर जावळे यांचा उपक्रम:

भुसावळ :- महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हिंदू संरक्षक रुग्ण रक्षक माननीय आमदार श्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त साईनिर्मल फाउंडेशन भुसावळ यांच्यातर्फे शहरात विविध ठिकाणी श्री हनुमान चालीसाचे मोफत वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, अर्जुन भाऊ खरारे,बिसन गोहर भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप सुरवाडे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, खुशाल जोशीभाजपा उद्योग आघाडी चे जळगाव जिल्हा ध्यक्ष :-मोनू अग्रवाल,कामगार आघाडी अध्यक्ष किरण मिस्त्री ओबीसी आघाडी चे भुसावळ शहर अध्यक्ष भावेश चौधरी,सहकार आघाडीचे अध्यक्ष लव झोडगे,गोपी सिंह राजपूत,प्रशांत पाटील, लोकेश जोशी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री हनुमान चालीसाचे वितरण करण्यात आले. हनुमान चालीसा च्या पठणा ने चैतन्य रोहित उर्जा शक्ती निर्माण होते आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपण समाजातील माजलेल्या त्यांना वठणीवर आणू शकतो. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध,भ्रष्टाचार रुपी रावण प्रवृत्ती च आपण दहण करू शकतो. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष व भाजपा चे शिशिर जावळे यांनी याप्रसंगी केले.,आभार प्रदर्शन चंद्रशेखर पाटिल यांनी केले.