मध्य रेल्वेचे प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन :

मभुसावळ – मध्य रेल्वेने सर्व स्थानकांवर निकषांनुसार योग्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उपलब्ध करून दिले आहेत. परंतु तरीही असे आढळून आले आहे की, काही प्रवासी स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी/बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालून ट्रेनच्या कामकाजात अडथळा निर्माण करतात.

या संदर्भात स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी/बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल (एफओबी) वापरण्यासाठी स्थानकांवर नियमितपणे घोषणा केल्या जात आहेत. आरपीएफने रूळांवरील अतिक्रमण (ट्रेसपासींग) करणार्‍यांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान याची जाणीव करून दिली आहे की रेल्वे रूळ ओलांडणे केवळ त्यांच्या जीवालाच धोका देत नाही तर ते रेल्वे कायद्यानुसार दंडनीय आहे.

सर्व प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी रूळांवरील अतिक्रमण (ट्रेसपासींग) टाळावे आणि स्थानकांवर प्रदान केलेल्या एफओबी/एस्केलेटर/लिफ्टचा वापर करावा.