भुसावळात नृत्य दिन साजरा : नुपूर कथक अॕकेडमीचा उपक्रम :

भुसावळ – जागतिक नृत्य दिन निमित्ताने भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अॕकेडमी च्या वतीने अखंड घुंगरुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दि. २९ रोजी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी एक तास घुंगरु नाद करण्यात आला.यात नृत्यशिक्षीका चारु भालेराव यांच्यासह कनिका नेमाडे, मन्विथा थोटा, लतिका श्रीखंडे, गिरिजा सावदेकर, मनिषिका आरुषी, चेतना नेमाडे, ज्ञानेश्वरी नेमाडे, सीमा पाठक, अवनी धाडसे, नुपूर भालेराव , चंन्द्रजा ईंगळे, अनघा वानखेडे, डिंपल गाढे, उर्वशी कोळी, शान्वी तन्नीरवार, हेमांगी पंडागरे, पुजा तन्नीरवार,निलम धाडसे, पुर्वा नेवे, यांनी सहभाग घेतला.यावेळी सामुदायीक नटराज पुजन करण्यात आला. अशाप्रकारे जागतिक नृत्यदिन उत्साहात संपन्न झाला.