भीषण अपघातात एरंडोलच्या सासु-जावयासह तिघे ठार – जालना जिल्ह्यातील बाणेगाव पाटीवर भरधाव ट्रक छोटा हत्ती वाहनावर आदळला : दोघे गंभीर जखमी


एरंडोल : भोकरदन-राजूर रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर बुधवार, 27 रोजी सकाळी साडेसहा वाजता भरधाव ट्रकने छोटा हत्ती वाहनाला जोरदार धडक दिल्याने एरंडोल शहरातील जावयासह सासूसह तिघे ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे.
रामदास रतन पाटील (40), कल्पनाबाई भरत पाटील (47) व कल्पना गोविंदा ठाकूर (45, सर्व रा.अमळनेर दरवाजा परीसर, एरंडोल) अशी मयतांची नावे आहेत.