श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रातील संधि तसेच “करियर निवडीसाठी उद्योगांना अपेक्षित कौशल्य” ह्या विषयांवर कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजीनीअरिंग विभागाच्या वतीने “पाईपिंग डिझाईन इंजीनीअरिंग ह्या क्षेत्रातील रोजगार आणि करियर निवड ” “प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रातील संधि ”तसेच “करियर निवडीसाठी उद्योगांना अपेक्षित कौशल्य” ह्या विषयांवर कार्यशाळा डॉ. श्रीकांत चौधरी आणि प्रा. आय. डि. पॉल यांच्या मार्फत घेण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी सांगितले कि तांत्रिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रचंड संधि ह्या क्षेत्रात निर्माण होणार आहेत आणि ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देत भावी तंत्रज्ञान बदलासाठी उद्योगधंद्यांना अपेक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्द करून देण्याचे आमचे प्रयत्न असून ही कार्यशाळा हा त्याचाच एक भाग.
ह्या संवादा दरम्यान डॉ. श्रीकांत चौधरी आणि प्रा. आय. डि. पॉल यांनी भारत तसेच जागतिक पातळीवर पाईपिंग डिझाईन व प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. अफाट संधी आणि अमर्यादित प्रगतीची दारे पाईपिंग डिझाईन व प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्र उघडून देते असे सांगतानाच ह्या संधींचे सोने करण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक असून आपले सेमिनार आणि प्रोजेक्टस अत्यंत काळजीपूर्वक निवडत त्याच्या अत्यंत बारीसारिक तांत्रिक बाबींची माहिती अवगत करणे, छोटे प्रोजेक्टस आणि अभ्यासक्रमातील सॉफ्टवेयर यांचा अभ्यास आणि प्रात्यक्षिक अभ्यासू पद्धतीने करणे ह्या बाबी पाईपिंग डिझाईन व प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रात सफल करियर घडवून देऊ शकतात असे सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, मेकॅनिकल इंजीनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.अविनाश पाटील, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.