भुसावळातील आरोपी निखिल राजपूतसह ६ जण फरार ; न्यायालयात हजर न झाल्यास आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश :


भुसावळ – भुसावळ बाजापेठ पो.स्टे. गु.र.क्र. ४६६ / २१, भांदवि कलम ३०७, ३५३, ३३२, १४३,
१४७, १४९, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ गुन्हयातील मुख्य आरोपी निखिल राजपूतसह सहा आरोपी फरार असून अति. जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष न्यायालय (मोका कोर्ट), भुसावळ यांनी
या सात आरोपीतांना कोर्टात हजर होण्याकरीता उद्घोषणा नोटीस आदेशीत केलेली आहे. यानुसार
सदर आरोपी हे दिनांक १९/०५/२०२२ रोजी पर्यत न्यायालयात हजर न राहील्यास त्यांचे विरूद
सी. आर. पी. सी. कलम ८३ प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे .
फरार आरोपी १) निखील सुरेश राजपुत, वय २८ वर्षे, रा. दत्तनगर, श्रीराम नगर, वांझोळा रोड, भुसावळ,
२) अक्षय प्रताप न्हावकर ऊर्फ थापा वय २४ वर्षे, रा. चक्रधर नगर, रोटरी हॉल जवळ, भुसावळ,
३) नकुल थानसिंग राजपुत, वय २८ वर्षे, रा. चंदाबाई सोसायटी, आंबेडकर वसतिगृह जवळ, भुसावळ,
४) आकाश गणेश पाटील, वय २३ वर्षे, रा. नारायण नगर, शिरपुर कन्हाळा रोड, भुसावळ,
५) अभिषेक राजेश शर्मा, वय २१ वर्षे, रा. चमेली नगर, वांजोळा रोड, भुसावळ,
६) निलेश चंद्रकांत ठाकुर, वय २१ वर्षे, रा. श्रीराम नगर, दत्त मंदिराच्या जवळ, भुसावळ
७) चेतन संतोष पाटील, वय २१ वर्षे, रा. श्रीरामनगर, वांजोळा रोड, भुसावळ हे या गुन्हयातील आरोपी असुन ते फरार आहेत.

उपरोक्त नमुद आरोपीतां विरुध्द अति. जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष न्यायालय (मोका कोर्ट),
भुसावळ यांनी
नमुद आरोपीतांना कोर्टात हजर होण्याकरीता उद्घोषणा नोटीस आदेशीत केलेली आहे. परंतू
नमूद आरोपी हे दि. १९/०५/२०२२ रोजी पर्यत न्यायालयात हजर न राहील्यास त्यांचे विरूद
सी. आर. पी. सी. कलम ८३ प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

सदर आरोपीतां बाबत कोणास काहीएक माहिती मिळाल्यास
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुसावळ उपविभाग – फोन नं. ०२५८२-२४१६३३ तसेच भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. फोन नं. ०२५८२-२२२३९९ यांवर संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.