मध्य रेल्वेत ६७ वा महाव्यवस्थापक वार्षिक रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा संपन्न ; मुंबई आणि नागपूर विभागाने संयुक्तपणे संपूर्ण कार्यक्षमता शील्ड जिंकली :

मुंबई – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २६.४.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट आणि अनुकरणीय काम केल्याबद्दल १३६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वार्षिक पुरस्कार आणि विभाग/कार्यशाळा/युनिट्स यांना २१ शिल्ड्स प्रदान केल्या. त्यांनी विभाग, कार्यशाळा, रेल्वे स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता शील्ड प्रदान केल्या.

मुंबई आणि नागपूर विभागाला संयुक्तपणे एकूण कार्यक्षमता (??????? ??????????) शील्ड जिंकली. वाणिज्यिक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि स्वच्छतेचा समावेश असलेल्या विभागीय कार्यक्षमतेसाठी मुंबई विभाग ४ शिल्डचा अभिमानास्पद विजेता ठरला. मुंबई विभागाने सोलापूर विभागासह संयुक्तपणे अभियांत्रिकी, भुसावळ विभागासह संयुक्तपणे सिग्नल आणि दूरसंचार, पुणे विभागासह संयुक्तपणे कार्मिक शिल्ड आणि नागपूर विभागासह संयुक्तपणे संरक्षा शील्ड जिंकली. शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांनी संबंधित विभागाच्या संबंधित शाखा अधिकाऱ्यांसह शिल्ड स्वीकारली.

सोलापूर विभागाने सेफ्टी, मेडिकल शिल्ड, पुणे विभागाने वक्तशीरपणा (Punctuality) शिल्ड, नागपूर विभागाने अकाउंट्स आणि ऑपरेटिंग शिल्ड आणि भुसावळ विभागाने ट्रॅक मशीन शील्ड जिंकली. माटुंगा वर्कशॉप, मुंबई यांनी कार्यशाळा कार्यक्षमता शील्ड जिंकली. पुणे आणि भुसावळ विभागांनी संयुक्तपणे स्टोअर्स शिल्ड, भुसावळ आणि नागपूर विभागांनी संयुक्तपणे वर्क्स एफिशिएन्सी शिल्ड तर अहमदनगर आणि पुणे युनिट्सनी संयुक्तपणे उत्कृष्ट निर्माण युनिट शिल्ड जिंकले. मुंबई विभागातील मुलुंड स्थानकाला स्वच्छतेसाठी सी, डी व ई (C, D आणि E) श्रेणीतील सर्वोत्कृष्ट स्थानकासाठी शिल्ड आणि भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकाने स्वच्छतेसाठी (A1, A आणि B श्रेणीतील स्टेशन) सर्वोत्तम स्थानकाचा पुरस्कार पटकावला. पुणे विभागातील उरुळी रेल्वे स्थानकाला सर्वोत्कृष्ट राखीव उद्यानाचा तर द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट उद्यानाचा पुरस्कार नागपूर विभागातील मुलताई स्थानकाला देण्यात आला.

अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक बी.के. दादाभॉय, अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ.ए.के. सिन्हा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी विभागांचे प्रधान प्रमुख आणि शिल्ड विजेते विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपस्थित होते.

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, यांनी यावेळी संबोधित करताना कोरोना साथीच्या वर्षात मध्य रेल्वेने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की सर्व प्रधान विभाग प्रमुख आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत कर्मचारी वर्ग असल्याचा मला अभिमान आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले. यापूर्वी डॉ.ए.के. सिन्हा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी यांनी स्वागत केले.

मध्य रेल्वेचे सर्व प्रधान विभागप्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (CRWWO) अध्यक्षा श्रीमती मीनू लाहोटी, आणि कार्यकारी समिती सदस्या, मान्यताप्राप्त युनियन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ॲवॉर्ड वितरणा आधी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. जनसंपर्क विभागातर्फे हा संपूर्ण कार्यक्रम यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.