मानवसेवा ईश्वरसेवा गृपच्यावतीने शाळा वंचित गोर गरीब विद्यार्थ्यांना सँडल्स वितरण :


दीपनगर : मानवसेवा ईश्वरसेवा गृपच्यावतीने नेहमीच विविध उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविले जातात. भुसावळ शहरातील विकास कॉलनीतील माऊली नगराच्या हनुमान मंदीरात गोर गरीब शाळाबाहय मुला मुलींची सायंकाळी ५ ते ७ शाळा भरविली जाते. या ठिकाणी परिसरामध्ये विविध बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांची ५२ मुलेमुली प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत आणि परिसरातील प्रशिक्षित दोन तरुणी दिव्या सनंसे आणि आचल पाटील हया अतिशय पोटतिडकीने शिकवितात. शाळेचे तोंड ही न पाहीलेली मुले स्वतःचे नाव, गाव स्पष्ट सांगतात. इंग्रजी शब्द असलेली मराठी, हिंदी बालगीते लिलया गातात. अशी मुले शाळेत अनवानी येतात त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांना सँडल देण्याचा संकल्प गृपने केला व या अभिनव शाळेला भेट देवून गृपच्या वतीने सर्व मुलांना सँडल देण्यात आले. सर्व मुलांना खुप आनंद झाला, त्यांच्या गोंडस चेहर्‍यावर हास्य फुलले.
गृपचे प्रमुख संयोजक मोहन सरदार यांनी या सत्कर्मा साठी गृपच्या सर्व दात्यांचे आभार मानले. यापुढे देखील शैक्षणिक उपक्रमासाठी गृप मदत करीत राहील. युवा सदस्य प्रफुल निकम, योगेश मोरे, धिरज साबळे यांनी विशेष परिश्रम घेतल.