पिंपरी : सोशल मिडीयातून मैत्री बहरल्यानंतर पुणे शहर वाहतूक शाखेतील कर्मचार्याने अभियंता महिलेशी बळजबरीने शारीरीक संबंध निर्माण केले शिवाय नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत मोशी व आकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 या कालावधीत अत्याचार केला.

वयोवृद्धांना बोलण्यात गुंतवून मौल्यवान ऐवज लांबवणारा भामटा भामटा एलसीबीच्या जाळ्यात
आरोपी पोलिसाला अटक
या प्रकरणी विक्रम गणपत फडतरे (34, रा. भिलारेवस्ती, पुणे) या पोलिसाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडित 30 वर्षीय महिलेने शुक्रवार, 22 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.
जबरदस्तीने ठेवले संबंध
पोलिस कर्मचारी असलेल्या विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुक द्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.


