भुसावळ शहरात तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला ! –

भुसावळ -शहरातील रेल्वे हॉस्पिटलच्या मागील समता नगर भागातील तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात आतिश रवींद्र खरात सह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की दिनांक -21/04/2022 रोजी पहाटे 02. ते सकाळी 05. वा .चे दरम्यान समता नगर येथे आशिष स्टीफन आलोटकर याला आरोपी आतिश रविंद्र खरात,पप्या साळवे पुर्ण नाव माहीत नाही, आकाश खिल्लारे पुर्ण नाव माहीत नाही, सुमित घनघाव पुर्ण नाव माहीत नाही सर्व रा.समता नगर या चार आरोपीनी यांनी गुरुवार रोजी रात्री आशिष आलोटकर यांचे घरात हल्ला करण्याचे उद्देशाने प्रवेश लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी आतिश रविंद्र खरात याने आशिष आलोटकर यांस जीवेठार मारण्याच्या उदेशाने फायटर ने मारहाण केली तसेच तीन आरोपींनी आशिष अलटकर व साक्षीदार यांना शुक्रवार पहाटे 02 ते सकाळी 05. वाजेपावेतो घरात कोंडुन ठेवले व शीवीगाळ केली. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुरनं- 52/2022 भादंवि कलम. 307,452,34,323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.यात आतिष खरात हा फरार असून तीन आरोपीना पोलिसांनी तडकाफडकी ताब्यात घेतले. तपास सपोनि संदिप दुनगहू हे करीत आहेत.