एस एस बी टी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व एस एस बी टी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी पौर्णिमा संजय द्राक्षे हिस मिनी गोल्फ या प्रकारामध्ये महिला गटात रौप्य पदक प्राप्त झाले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार व क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पौर्णिमा द्राक्षेचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
या खेळाडूस क्रीडा संचालक प्रा. जे बी सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.