एस एस बी टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व एस एस बी टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बिसीए विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी तनुश्री फुलझाडे हिस महिला संघात कांस्यपदक ( मिनी गोल्फ) व सुमित संतोष पाटील ( मिनी गोल्फ) यास पुरुष डबल विभागात कांस्य पदक प्राप्त झाले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. पाटील, क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
या खेळाडूना क्रीडा संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.