भुसावळ : भारतीय रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथील रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे नगराध्यक्ष रमण भोळे उद्योजक मनोज बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले .
म्युझियम मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी माजी नगरसेवक रमाकांत उर्फ बापु महाजन व नगरसेविका सोनाली महाजन यांनी रेस्टॉरंट सुरू केले आहे. भारतीय रेल्वेचा दिडशे वर्षांपूर्वीचा पुर्ण इतिहास सर्व जनतेला रेल्वे म्युझियममध्ये बघायला मिळणार असल्याचे सुरेश न्याती यांनी म्हटले आहे . म्युझियम मध्ये मुलांना खेळायला खेळणी आहेत . व्हिडिओ आहे. लाँन आहे .तसेच रेस्टॉरंट आहे फूड प्लाझा आहे येथे आल्यावर लोकांना रेल्वेचा इतिहास आणि इंटरटेनमेंट पाहायला मिळणार असल्याचे न्याती यांनी सांगितले.
यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी माजी नगरसेवक सुनील नेवे भाजपा शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे माजी नगरसेवक शेख पापा शेख कालु , अनिकेत पाटील , राजेश लोहाटी , अनिरुद्ध कुलकर्णी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, किरण कोलते ,रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललित मुथा ,माजी नगरसेवक मुकेश पाटील, अँड .बोधराज चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अजय नागरानी , सतिष सपकाळे, गिरीश महाजन , आदी उपस्थित होते.



