भुसावळ – हनुमान जयंती निमित्त यावल तालुक्यातील आदीवासी वस्ती पैयझरी व आंबापाणी या ठिकाणी श्रीहनुमानाच्या मुर्तीची स्थापना देवगिरी कल्याण आश्रम च्या श्रध्दाजागरण या आयामाकडुन करण्यात आली.
वस्तीवरील लोकांनीं एक दिवस आधी भजन ,किर्तन करून जागरण केले विधिवत पुजन करून महाराजाच्यां हस्ते मुर्तीचीं स्थापना केली. यावेळी भंडार्याचा लाभ भक्तांनी घेतला. सदर कार्यक्रमाला श्रध्दाजागरण प्रमुख यशवंत वळवी, कलीम बारेला,तिरा महाराज, रामदास महाराज,जनजाती सुरक्षा मंच प्रांतसदस्य एडव्होकेट जास्वंदी भंडारी(पाटील) सचिव काशीराम बारेला, ऍडव्होकेट जयश्री देशमुख, ॲड. निलेश भंडारी , जिल्हा संघटनमंत्री विरसिंग वसावे, संतोष बारेला,मनिषा देशमुख, गोसेवक रोहित महाले,पसाद भापकर, झामसिंग बारेला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



