भुसावळ शहरात विविध कार्यक्रमांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त गुरूवारी (दि. १४) शहरात विविध कार्यक्रमांनी डाॅ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तर विविध शाळेत सुद्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालय व स्वा सै, कृ, पा, पाटील प्राथमिक विद्या मंदिरातर्फे महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यमंक्रमाच्या अध्यक्षस्थानी नर्मदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, माध्यमिक मुख्याध्यापिका कविता जावळे, व प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगीनी चौधरी उपस्थित होत्या. उपशिक्षिका आशा ठोंबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी मनाेगत व्यक्त केले, दीपक तायडेंनी सुद्धा भाषणातून त्री शरण पंचशील म्हणून महामानवास बोधिसत्व, विश्र्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. यावेळी सर्व शिक्षक यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रदीप परखड यांनी केले. आभार पी,जे चौधरी यांनी मानले, कार्यक्रमाला समीर तडवी, मीनाक्षी धांडे, सुनीता बऱ्हाटे, सी,एम, चौधरी निलकमल भोळे व कमलाकर झोपे उपस्थित होते.

पतंजली याेग साधना केद्रात कार्यक्रम

येथील जळगाव राेडवरील हिराे हाेण्डा शाेरूम येथे पतंजली योग साधना केंद्रात सुरू असलेल्या योगवर्गात सकाळी पाच वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले. पतंजलि योग समिति भुसावळ तालुका प्रभारी व जेष्ठ योगशिक्षक तुळशीदास सुर्यवंशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले. बाबासाहेब हे नियमीत याेगा करत हाेते, कारण त्यांचे तन व मन खुप मजबुत हाेते असे मनाेगत त्यांनी व्यक्त केले. योगमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी योग वर्गातील सर्व बंधू-भगिणी यांनीही सहभाग घेतला हाेता.

के नारखेडे विद्यालयात आंबेडकर जयंती

येथील के. नारखेडे विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात झाली. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण

प्रसारक मंडळ संस्थेचे सेक्रेटरी पी. व्ही. पाटील यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सदस्य विकास पाचपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी. किरंगे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय. एन. झोपे, पर्यवेक्षक एस एल राणे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .याप्रसंगी

महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर एसटी चौधरी यांनी मनाेगत व्यक्त केले.

बियाणी स्कूलमध्ये कार्यक्रम

येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बियाणी एज्यूकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रसंगी बियाणी गृपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, प्राचार्य डी एम पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.

भोळे महाविद्यालय, भुसावळ

भुसावळ । शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात गुरुवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परीषद प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्राचार्य डॉ.फालक, केतन कोळी, मनीष वाढे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे तर सूत्रसंचालन प्रशिक तायडे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मानले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, रासेयोचे माजी भुसावळ विभाग समन्वयक प्रा.अनिल सावळे, रासेयो महिला अधिकारी प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, डॉ.आर.बी.ढाके, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.दीपक जैस्वार, किरण पाटील, प्रकाश चौधरी, सुनील ठोसर यांच्यासह प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित असल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले अाहे.

श्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगावला कार्यक्रम

भुसावळ । तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संचालक ऋषीस्वरूप स्वामी व गोपाळ भगत यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भीम गीते गाऊन तसेच भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांची शैक्षणिक माहिती देऊन संविधानात असलेल्या विविध मुद्यांचा उहापोह केला. याप्रसंगी शाळेच्या संस्था सभासदांसह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीतर्फे जयंती

भुसावळ । महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षीत बऱ्हाटे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे यांनी महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी अनुयायांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, राजु खरारे, शंकर शेळके, अलका शेळके, अर्जुन खरारे, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, मंगेश पाटील, वेदप्रकाश ओझा, कैलास शेलोडे, धनराज बाविस्कर, अनिल पाटील, रहेमान शेख, संतोष ठोकळ, सुरेश जोहरे, विक्की गोहर, कमलाकर अडकमोल, युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुळकर्णी, श्रेयस इंगळे, लोकेश जोशी, चेतन सावकारे, चेतन बोरोले, गोपीसिंग राजपूत, नागेश खरारे, तुषार कुरकुरे आदी उपस्थित होते.

हिंदी महाविद्यालय, भुसावळ

भुसावळ । येथील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. याप्रसंगी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही प्रतिमेचे पूजन केले.प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.