भुसावळ शहरात जामनेर रोडवरील अष्टभूजा देवीची
१५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर रोडवरील शनिमंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत या बारा गाड्या भगत हरिष अनिल लोखंडे यांनी ओढल्या.तर बगले विनायक शंकर झोपे व निलेश पाटील हे होते.

या दरम्यान अष्टभूजा देवीची बारागाड्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती या बारा गाड्या यशस्वीतेसाठी एकनाथ पाटील भरत परदेशी, मुकेश फेगडे,प्रकाश सैतवाल नंदू ठाकूर, स्वप्नील भारंबे माधव ठाकूर,प्रतीक दाभाडे, अशोक पाटील, दिलीप चौधरी, विशाल पाचपांडे यांनी परिश्रम घेतले.
गेल्या आठवड्यात सतारे भागात बारा गाड्या ओढताना दुर्घटना झाली होती.बारागाड्यांखाली एका तरुणांचा मृत्यू,तर चौघे जखमी झाले होते.या पार्श्वभूमीवर जामनेर राेडवरील बारागाड्यांसाठी पाेलिस बंदोबस्त वाढवण्यात होता .


