भुसावळ – सिद्धार्थ बुद्ध विहार स्थित स्कैन गृपच्यावतीने ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले जयंती साज़री करण्यात आली
स्कैन गृपची महात्मा जोतिराव फुले या नावाने अभ्यासिका आहे यात एमपीएससी व यूपीएससी परीक्षा व रेल्वे अधिकारी व कर्मचारी होण्यास आवश्यक अभ्यास घेतला जातो . म्हणून फुले जयंती निमित्तया अभ्यासीके मध्ये उपलब्ध असलेली पुस्तके ठेवण्याकरीता दोन बुक सेल्फ (रैक ) गिफ्ट म्हणून देण्यात आले .
प्रारंभी महान पुरुषाचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले बुद्ध वंदनाने प्रारंभ झाला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित पोवाडा (गीत ) सादर करण्यात येवून प्रारंभ झाला.यावेळी विद्यार्थ्यानी सुद्धा आजच्या बिकट परिस्थितीवर आधारित विषयावर पथनाट्य सादर केले .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची महिला जिल्हा सरचिटणीस तथा सावित्री बाई फुले अभ्यासीकेच्या सदस्या सौ संगीता राजेंद्र भामरे , रेल्वे अधिकारी एपीओ रामटेके , जंबादे व सोनावणे , तुषार , व प्रमोद नीळे यांचेसह रेल्वे अधिकारी व कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .
प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत वक्त केले. तर डॉ बाबा साहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असल्याने सर्व समाज बांधवानी शांततेत आ आनंदाने जयंती साजरी करण्याचे आवाहन करून भीमगीत सादर करण्यात आले व कार्यकरामाची सांगता झाली .



