भुसावळ – 7 एप्रिल आरोग्य दिवसाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब भुसावळ व पुंडलिक गणपत ब-हाटे माध्यमिक विद्यालयातर्फे
दहावीच्या युवा वर्गातील विद्यार्थ्यांना करियर विषयाचे मार्गदर्शन व युवावर्गातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता वयात येणार्या युवावर्गाला व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .
इनरव्हील क्लब व पुंडलिक मराठी माध्यमिक विद्यालय तर्फे आयोजित मार्गदर्शन पर कार्यशाळेत अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वंदिता पारे होत्या
प्रसंगी वंदीता पारे यांनी आशा प्रकारच्या कार्यशाळेचें आयोजन होणे ही काळाची गरज आहे असे सांगीतले तर प्रमुख वक्ता डॉ वंदना वाघचौरे यांनी यावेळी युवा वर्गात अलीकडे व्यसनाधीनता वाढली आहे. आणि त्यासाठी पालकांसोबतच प्रत्येक शाळेतही विद्यार्थ्यांना व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम शिक्षकांनी समजून सांगावे जेणेकरून विद्यार्थी त्यापासून परावृत्त होतील सोबतच COTPA ACT 2009 ची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक शाळेमधून होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
10 वी च्या पुढे योग्य करिअर निवडण्यासाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य मनीषा बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी इनरव्हील क्लब सदस्य प्रा. सविता शुक्ला यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली तर इनरव्हील सदस्या मीना ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाच्या प्राध्यापिका हेमांगी चौधरी यांनी केले तसेच प्राध्यापक जावळे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .



