भुसावळात सुरा घेऊन दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारात भागात एक तरुण हातात सुरा घेऊन दहशत निर्माण करीत असल्या बाबतची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना मिळल्यावरून त्यांनी त्वरित घटनास्थळी पथक रवाना करून शोध घेण्याच्या सूचना दिली.त्यावरून संशयित इसमास सुरा घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ.कृष्णा शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ०६/०५/२०२२ रोजी प्रविण राजू गवळी राहणार देवळाली कॅम्प नाशिक येथील असून भुसावळ शहरातील आठवडे बाजार महावीर ऑटो पार्ट भागात रात्री ०८.४५ वाजेच्या सुमारास प्राणघातक शस्त्र हातात बाळगून १४ इंच लांब (सुरा) दहशत निर्माण करीत होता म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला आर्म अँक्ट ४/२५ मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सुरा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोहेकॉ.विजय नेरकर,पोना किशोर महाजन, दिनेश कापडणे,गोपाळ गव्हाळे, समीर तडवी अशांनी मिळून केली.