चैत्र नवरात्र प्रारंभ निमित्त शैक्षिक आगाज तर्फे कार्बन क्रेडीटची शपथ ग्रहण ;

भुसावळ- चैत्र नवरात्री प्रारंभच्या निमित्ताने शैक्षिक आगाज महाराष्ट्राच्या वतीने कार्बनक्रेडिटची शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला

येथील सुराणा साधना भवन मध्ये आयोजित कार्यक्रमास आमदार संजय सावकारे ,सौ रजनी सावकारे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, आयपीएस अधिकारी आतिष कांबळे, सुगनचंद सुराणा ,यतीश डुंगरवालकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षांची पूजा करून मान्यवरांचे वृक्ष भेट देवून स्वागत करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी आमदार सावकारे म्हणाले आज मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे, छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा वाहनांचा वापर करत आहोत . त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनचे प्रमाण पसरत आहे त्याचे दुष्परिणाम आपण सर्व अनुभवत आहोत याला आळा घालायचा असेल तर प्रत्यक्ष कृती करून वाहनांचा अतिरेक वापर टाळायला हवा असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले

यानंतर डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनीही वृक्षांचे महत्त्व सांगून वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढते आणि या तापमानाचे परिणाम आपण भुसावळकर जाणत आहातच हे तापमान कमी करायचं असेल कमीत कमी वाहनाचा वापर करून वृक्ष लावणे व ते जगविणे आवश्यक आहे आणि सर्व आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने होऊ शकते असे विचार व्यक्त केले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी शैक्षिक आगाज तर्फे सन 2022 पासून दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आठवड्यात कार्बन क्रेडिट की शपथ दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्याभरात विविध माध्यमांतून 32 हजार विद्यार्थी व नागरिकांना शपथ दिली आहे यामध्ये प्रत्येकाने कमीत कमी वाहनाचा वापर करावा आरोग्य जपण्यासाठी पायी व सायकलचा वापर करावा असे आवाहन या शपथेच्या माध्यमातून दिली जात असते. या नंतर त्यांनी सर्वांना शपथ दिली

कार्यक्रमाला रघुनाथ आप्पा सोनवणे जयंतीलाल सुराणा, महावीर शेटे, जितेंद्र बेदमुथा, निलेश कुमार जैन, मोहनीश बाफना, विजय चोरडिया, कांतीलाल चोरडिया, निशांत पाटील ,पद्माकर घोडके, सौरभ जैन, इ . सहकार्य केले कार्यक्रमासाठी परिसरातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम चोरडिया यांनी तर आभार सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले .