भुसावळात भगवान झुलेलाल यांचा फोटो कंदील वरील बॅनर फाडल्याने १३ जणांनी एकमेकांविरुद्ध केला गुन्हा दाखल ! –

भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनी भागात भगवान झुलेलाल जयंती निमित्त दहा दिवसांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा ठिकाणी भगवान झुलेलाल यांचा फोटो असलेला कंदील बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर फडण्यात आले हे सांगण्यासाठी गेले असता याचा राग आल्याने सर्वांनी मिळून मारहाण केल्याने पोलीस स्टेशनला भगवान झुलेलाल यांचा फोटो कंदील वरील बॅनर फाडल्याने १३ जणांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी प्रकाश रमेशलाल बत्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ०१/०४/२०२२ रोजी ०१.१५ वाजेच्या सुमारास आरोपी अशोक चंद्रलाल चुगेजा,कुणाल दिलीपकुमार छाबडिया,दिलीपकुमार गवर्धन छाबडिया,नारायण अशोक ठारवानी राहणार सिंधी कॉलनी यांनी भगवान झुलेलाल यांचा फोटो कंदील वरील बॅनर फाडल्याने त्यांना फिर्यादी प्रकाश रमेशलाल बत्रा बोलण्यास गेलो असता त्यांचा राग आल्याने वरील आरोप सह गौतम अशोक चुगेजा असे सर्वांनी मिळून फिर्यादी व शालक यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरनं २१३/२०२२ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १४३,१४७,३२३,४२७,५०४,५०६ प्रमाणे दिनांक ०४/०४/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशनला दुसरी फिर्याद अशोक चंद्रलाल चुगेजा राहणार सिंधी कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ०१/०४/२०२२ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी जेवण करून बाहेर फेऱ्या मारण्यासाठी आलो तेव्हा फिर्यादिस नानक मेडिकल समोर भगवान झुलेलाल यांचा फोटो असलेला कंदील खाली पडलेला दिसल्याने फिर्यादीने निक्की बत्रा यांना फोन वरून सांगितले की,भगवान झुलेलाल यांचा फोटो खाली पडलेला आहे.असे सांगण्याचा त्यास राग आल्याने तो फिर्यादिस म्हणाला की,मी तेथे येतो असे बोलून फोन ठेवला व नंतर पाच मिनिटांनी प्रकाश उर्फे निक्की बत्रा व त्याचे सोबत विक्की रमेशलाल बत्रा,सनी अनिलकुमार बत्रा,ओम सुनीलकुमार डुंबा,मनीष उर्फे गोलू राजकुमार रतनानी,राकेश गोपालदास कुकरेजा,तरुण अशोककुमार कुकरेजा,गुलचंद सुनीलकुमार डुंबा सर्व राहणार सिंधी कॉलनी भुसावळ अशांनी फिर्यादीस चापटा- बुक्क्यांनी व लाथांनी जमिनीवर पाडून मारहाण केली व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून यांचे विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरनं २११/२०२२ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १४३,१४७,३२३,५०४,५०६ प्रमाणे दिनांक ०४/०४/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.